दर महिन्याला मिळणार 59 हजार रुपयांचे वेतन
समुद्रकिनारी निवांतपणे बसून पुस्तके वाचणे पसंत असल्यास तुम्हाला एक जॉब अत्यंत आवडणार आहे. मालदीवमध्ये कुनफुनाधू बेटावर एक लक्झरी रिसॉर्ट पुस्तकांच्या विक्रीसाठी एक वर्षाच्या करारांतर्गत नवी भरती करत आहे. सोनवा फुशी रिसॉर्टने स्वतःच्या ‘बेयरफूट बुकसेलर’ पदासाठी (अनवाणी पायांनी पुस्तकांची विक्री) अर्जप्रक्रिया खुली केली आहे. यात एक वर्षासाठी या बेटावर एक पुस्तकांचे दुकान चालविता येणार आहे.

अल्टीमेट लायब्ररीचे विक्री व्यवस्थापक एलेक्स मॅक्वीन यांना एका पुस्तकप्रेमीचा शोध आहे, या व्यक्तीला दिवसभर अनवाणी पायांनी राहण्याचा कुठलाच त्रास होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. पुस्तकांची विक्री तेथे अनवाणी पायांनीच होऊ शकते, कारण बेटावर कुणालाच पादत्राणे वापरण्याची अनुमती नाही. या जॉबचा करार ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. अनवाणी पायांनी संबंधिताला दररोज एक पुस्तकांचे दुकान चालविणार आहे. याचबरोबर अकौंटिंग आणि स्टॉक मार्केटिंग करावे लागणार आहे.
अर्जदाराला स्वतःहून तेथे यावे लागेल आणि जॉबनंतर स्वतःच सर्व हाताळावे लागणार असल्याचे मॅकक्वीन यांनी सांगितले आहे. सोनवा फुशी रिसॉर्टसोबत पुस्तकांचे दुकानही चालवत आहेत. यशस्वी उमेदवाराला तेथे मोफत वास्तव्य आणि जेवणाची सुविधा प्राप्त होऊ शकते. रिसॉर्टकडून संबंधिताचा वर्क परमिट आणि विमानप्रवासाचा खर्चही मिळू शकतो. तसेच दर महिन्याला 59 हजार रुपयांचे वेतन देण्यात येणार आहे.









