वृत्तसंस्था/ गिरोना
ला लिगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बार्सिलोनाने गिरोनाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. त्या सामन्यातील एकमेव गोल खेळाच्या उत्तरार्धात पेद्रीने नोंदवला.
या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात बदली खेळाडू पेद्रीला मैदानात उतरवण्यात आले. पेद्रीचा हा बार्सिलोना क्लबकडून खेळतानाचा 100 वा सामना होता. 20 वर्षीय पेद्रीने 61 व्या मिनिटाला अल्बाच्या पासवर गिरोनाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत एकमेव निर्णायक गोल केला. या विजयामुळे बार्सिलोना संघाने ला लिगा संघाच्या गुणतक्त्य़ात 47 गुणासह आगाघाडीचे स्थान मिळवले असून रियल माद्रिद 41 गुणासह दुसऱया स्थानावर आहे. गिरोना हा संघ 21 गुणासह 12 व्या स्थानावर आहे.









