वृत्तसंस्था/ बार्सिलोना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात बर्सिलोना संघाने सेल्टाचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात बार्सिलोना संघातील ब्राझीलचा खेळाडू रॅफिनाची कामगिरी दर्जेदार झाली.
या सामन्यात बार्सिलोनाकडून दुखापतीच्या कालावधीत उशिरा 2 गोल नोंदविले गेले. रॅफिनाचा शेवटच्या 2 मिनिटांच्या कालावधीत गोल निर्णायक ठरला. या सामन्यात रॅफिनाने 2 गोल केले. चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात विविध स्पर्धांमध्ये रॅफिनाने 30 गोल नोंदविले आहेत. स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या शर्यतीमध्ये आता बार्सिलोना आणि रियल माद्रीद यांच्यात आता केवळ 7 गुणांचा फरक आहे. अॅटलेटिको माद्रीद आता 10 गुणांनी पिछाडीवर आहे.









