परुळे / प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे परुळे सुतारवाडी येथील कृष्णा भीवा मेस्त्री यांच्या घरावर जीर्ण झालेले वडाचे झाड उन्मळून पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर मुसळधार पडणार्या पावसाने परिसरात हजेरी लावल्यामुळे मेस्त्री यांच्या घराच्या बाजूला असलेले झाड मध्यरात्रीच्या सुमारास उन्मळून पडले. त्यामुळे घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मेस्त्री कुटुंबावर चार दिवसात झालेला हा दुसरा आघात आहे. नुकतेच त्यांचा भाऊ संतोष भिवा मेस्त्री यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यातून सावरत असताना ही नैसर्गिक आपत्ती आली. त्याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना घडली त्याच दिवशी मेस्त्री यांच्या घरी आलेले पाहुणे संध्याकाळी मुंबईला गेल्याने ते देखील बचावले. घराच्या माडीवर मुंबईहून आलेले पाहुणे मंडळी झोपत होती . ते जर त्याठिकाणी असते तर अनर्थ घडला असता . घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रणिती आंबडपालकर ,माजी सभापती निलेश सामंत , उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू ,प्राजक्ता पाटकर ,सीमा सावंत यांनी भेट देत पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी श्री आर आर गवते ,कोतवाल स्वप्निल वरक यांनी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. माजी सभापती निलेश सामंत यांनी मेस्त्री यांना रुपये दहा हजाराची तात्काळ मदत केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









