नवी दिल्ली :
फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी ऑप्ट्रा नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. हा एक फ्रँचायझी व्यवसाय आहे. ज्याचा उद्देश आशियामध्ये ग्राहक ब्रँडच्या विस्ताराच्या पद्धतीत क्रांती घडवणे आहे. ऑप्ट्रा फ्रँचायझी व्यवसायांचा एक पोर्टफोलिओ तयार करत आहे जिथे प्रत्येक फ्रँचायझी स्थानिक बाजारपेठांमध्ये विशेषज्ञ राहणार आहे. हा उपक्रम त्यांना केंद्रीय विकसित तंत्रज्ञान आणि सामायिक जागतिक पुरवठा-साखळी पायाभूत सुविधांसह सक्षम बनविण्यासाठी काम करणार असल्याचेही म्हटले आहे. ऑप्ट्राचे संस्थापक आणि अध्यक्ष बिन्नी बन्सल म्हणाले, ‘अनेक ग्राहक ब्रँडमध्ये जागतिक स्तरावर विस्तार करण्याची क्षमता आहे, परंतु नवीन बाजारपेठांमध्ये टिकून राहणे त्यांना कठीण जाते. सांस्कृतिक, पायाभूत सुविधा आणि नियामक अंतरांमुळे ते गुंतागुंतीचे बनते, विशेषत: वेगाने विकसित होत असलेल्या किरकोळ क्षेत्रात टीकणे अडचणीचे ठरते.’









