कोल्हापूर शहरात आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर लावले गेल्याचे समोर आले. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे. बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.
देशात राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी, अडाणी समूहाच्या कथित घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ, राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने रद्द केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









