आझमनगर येथील प्रकाराने जनतेत संताप
बेळगाव : ऐतिहासिक वक्फ दुरुस्ती विधेयकाचा राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतर झाल्यानंतर या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे. रविवारी आझमनगर परिसरात ट्रॅफिक सिग्नलवर कायद्याला विरोध दर्शविणारा बॅनर लावण्यात आला होता. ‘वी रिजेक्ट वक्फ बिल’ असा मजकूर असलेला बॅनर आझमनगर येथील मुख्य चौकात लावण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या काही स्थानिक नागरिकांनी या बॅनरविषयी एपीएमसी पोलिसांनाही माहिती दिली. रात्रीपर्यंत ट्रॅफिक सिग्नलवर हा बॅनर तसाच होता.









