एटीएम, ऑनलाईन व्यवहारांवर ताण
बेळगाव : आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएम आणि ऑनलाईनद्वारे पेमेंट करण्यावर अतिरिक्त ताण वाढणार आहे. शुक्रवारी 26 जानेवारी, शनिवारी चौथा शनिवार तर रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका तीन दिवस बंद राहणार आहेत. बँकांप्रमाणेच शासकीय कार्यालयांना तीन दिवस सुटी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सणासुदीच्या काळात आणि शासकीय सुटीदिवशी बँका बंद ठेवल्याने एटीएममधून अधिक प्रमाणात रोकड काढली जाते. शुक्रवारपासून बँका बंद राहणार असल्याने गुरुवारीच बँकांमध्ये गर्दी झाली होती. किरकोळ व्यवहार वगळता रोखीने व्यवहार करणाऱ्या नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सध्या कॅशलेस व्यवहार वाढल्याने बँकांवरील ताणही कमी होऊ लागला आहे.









