प्रतिनिधी/ वास्को
वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांचे वास्को व चिखली येथील फ्लॅट शासकीय मध्यस्थीने सारस्वत बँकेने ताब्यात घेतले आहेत. कर्जाची परतफेड झाली नसल्याने बँकेने कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुरगावचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी शुक्रवारी ही कारवाई केली व माजी आमदारांचे चिखली व वास्कोतील फ्लॅट बँकेच्या ताब्यात दिले. या कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली. आमदार कार्लुस आल्मेदा भाजपचे आमदार म्हणून वास्कोतून दोनवेळा निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांना पराभूत व्हावे लागले होते.









