बेंगळूर :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ बडोदाने मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांवर लावले जाणारे शुल्क रद्द केले आहे. सदरचा नियम हा 1 जुलै 2025 पासून लागू झाला असल्याची माहिती बँकेने दिली आहे. असं जरी असलं तरी प्रीमियम सेविंग अकाउंटवर हा नियम लागू नसणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. या खात्यामध्ये असणाऱ्या रकमेवर नेहमीप्रमाणे कमीत कमी बॅलन्स न ठेवल्यास शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने मागच्या आठवड्यामध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांवरील शुल्क रद्द केले होते. कॅनरा बँकेनेसुद्धा हा नियम लागू केला आहे. याचा अर्थ ग्राहकांना या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर त्यांच्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्याच्या कारणास्तव 11 सरकारी बँकांनी 2331 कोटी रुपये शुल्करुपी वसूल केले होते.









