नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर विविध बँकांनी आपल्या व्याजदरामध्ये याआधीच वाढ केली असल्याचे आपण पाहिलेच आहे. यामध्ये आता बँक ऑफ बडोदाचाही नंबर लागला आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या व्याजदरामध्ये 10 ते 20 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची नवी वाढ 12 जूनपासून प्रत्यक्षामध्ये अवलंबली जाणार आहे. बँकेचे नवे व्याजदर आता 6.60 टक्क्यावरून 6.80 टक्के तर 7.05 वरून 7.20 टक्के इतके होणार आहेत.









