Sanjay Rathod :चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा अन्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. बंजारा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी इशारा दिला. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना संधी देण्यात आल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता या नाराजी नाट्यात बंजारा समाजानेदेखील उडी घेतली आहे. त्यामुळे आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. (Pooja Chavan Suicide Case Latest News)
चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर ओढला आहे. राठोडांवर केली जाणारी टीका देशातील सबंध बंजारा समाजावर केली जात आहे. चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा न्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. राठोड यांच्यावर वेळोवेळी करण्यात येणाऱ्या टीकेनंतर बंजारा समाजाने आता याप्रकरणी विरोधी भूमिका घेतली असून, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढं असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता या नाराजी नाट्यात बंजारा समाजानेदेखील उडी घेतली आहे. त्यामुळे आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








