आयर्लंडचा 183 धावांनी पराभव, टी. रिदॉय सामनावीर
वृत्तसंस्था/ सिलेत
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान बांगलादेशने विजयी सलामी देताना येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 183 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात बांगलादेश संघातील रिदॉयने ‘सामनावीरा’चा पुरस्कार मिळवला असून त्याने 93 धावांची खेळी केली. हा सामना दिवस-रात्रीचा खेळवला गेला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 338 धावा जमवल्या. त्यानंतर बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 30.5 षटकात 155 धावात आटोपला.
आता या मालिकेतील दुसरा सामना 20 मार्चला तर तिसरा आणि शेवटचा सामना 23 मार्चला होणार आहे.
बांगलादेशच्या डावामध्ये टी. रिदॉयने 85 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह 92, तर अनुभवी शकीब अल हसनने 89 चेंडूत 9 चौकारासह 93 धावा झळकवल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 135 धावा भागीदारी केली. कर्णधार तमीम इक्बाल 3 धावावर बाद झाला. लिटॉन दासने 1 षटकार अणि 2 चौकारासह 31 चेंडूत 26, नजमूल हुसेन शांतोने 34चेंडूत 1 चौकारासह 25, मुशफिकर रहीमने 26 चेंडूत 3 षटकार आाि 3 चौकारासह 44, यासीर अलीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, तस्कीन अहमदने 1 षटकारासह 11, नेसुम अहमदने 7 चेंडूत 2 चौकारासह दोन चौकारासह 11 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 8 षटकार आणि 26 चौकार नोंदवले गेले. आयर्लंडतर्फे ग्रॅहॅम हुमे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 60 धावात 4 तर अॅडेर, मॅकब्रिने, कॅम्फर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इबादोत हुसेन आणि नेसुम अहमद यांच्या अचूक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 30.5 षटकात 155 धावात आटोपला. आयर्लंडच्या डावात डुहेनीने 1 षटकार आाि 4 चौकारासह 34, स्टर्लिंगने 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, कॅम्फरने 2 चौकारासह 16, डॉक्रेलने 6 चौकारासह 45, मार्क अॅडेरने 2 चौकारासह 13 धावा जमवल्या. आयर्लंडच्या डावात 2 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे इबादोत हुसेनने 42 धावात 4, नेसुम अहमदने 43 धावात 3, टी. अहमदने 15 धावात 2 आणि शकीब अल हसनने 23 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकात 8 बाद 338 (शकीब अल हसन 93, टी. रिदॉय 92, मुशफिकर रहीम 44, दास 26, नजमूल हुसेन शांतो 25, यासीर अली 17, टी. अहमद 11, नेसुम अहमदने नाबाद 11, ग्रॅहॅम हुमे 4-60, अॅडेर, मॅकब्रिने, कॅम्फर प्रत्येकी एक बळी.), आयर्लंड 30.5 षटकात सर्वबाद 155 (डुहेनी 34, स्टर्लिंग 22, कॅम्फर 16, डॉक्रेल 45, अॅडेर 13, इबादोत हुसेन 4-42, नेसुम अहमद 3-43, तस्कीन अहमद 2-15, शकीब अल हसन 1-23).









