वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफसोबत झालेल्या चकमकीत एका बांगलादेशी तस्कराचा मृत्यू झाला. अनेक तस्कर भारतीय हद्दीत सुमारे 150 यार्ड आत घुसून तस्करी करत होते. यावेळी त्यांची बीएसएफसोबत चकमक झाली. तस्करांनी बीएसएफवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बीएसएफने तस्करांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, जवानांची सूचना न मानता बीएसएफ जवानांनाच घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर चकमक झाली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका बांगलादेशी तस्कराचा मृत्यू झाला आहे. त्याच गटातील उर्वरित सहकाऱ्यांनी पळ काढला आहे. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न बीएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी केला. मात्र, सायंकाळपर्यंत अन्य कोणीही सापडू शकले नाही.









