वृत्तसंस्था/नागपूर
बांगलादेशची राजधानी ढाका येथून दुबईला जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानाचे गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रातील नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. नागपूर विमानतळ संचालक आबिद रुही यांनी तांत्रिक समस्येमुळे विमानाला उतरवावे लागल्याची माहिती दिली. लँडिंगनंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, असेही स्पष्ट करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाडाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपत्कालीन स्थितीत योग्य दिशानिर्देश देत विमानाचे लँडिंग करण्यात आले. यशस्वी लँडिंगमुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.









