ऑनलाईन टीम/तरुण भारत
बांगलादेशच्या (Bangladesh) चिटगांव (Chitgao) शहरात शिपिंग केंटेनर डेपोला भीषण आग लागली आहे. या आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून साधारण ४५० जण जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. स्फोट होऊन ही आग लागली आहे. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले आहेत. तर अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.
या अपघातात आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ४५० पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना (Workers) जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर रखमा लोकांचे शरीर ६० ते ८० टक्के भाजले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा स्फोट एवढा भयंकर होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचांना तडा गेला आहे. तसेच, या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटर अंतरावर ऐकू गेल्या. तसेच, शनिवारी रात्री लागलेल्या आगीवर रविवारी सकाळपर्यंत अग्नीशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत होते.
एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार “या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही,” अशी माहिती बांगलादेश आरोग्य विभागाचे संचालक हसन शहरयार यांनी दिली.