राजकीय उलथापालथ दरम्यान वकार यांचे वक्तव्य : युनूस सरकारला दिला संदेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बांगलादेशचे सैन्यप्रमुख जनरल वकार-उज-जमां यांनी देशाला समृद्ध अन् स्थिर पाहू इच्छितो असे वक्तव्य केले आहे. मजबूत आणि स्वस्थ लोकसंख्या देशासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असे वकार यांनी ढाका इंटरनॅशन मॅराथॉनमध्ये सामील होत म्हटले आहे. जनरल वकार यांचे हे वक्तव्य बांगलादेशात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ घडत असताना समोर आले आहे.
देशाची राजधानी ढाका येथे अलिकडेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबरर्हमान यांच्या निवासस्थानाला जमावाने पाडविले होते. या पार्श्वभूमीवर सैन्यप्रमुखांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला एकप्रकारे संदेश दिल्याचे मानले जात आहे.
मॅराथॉनच्या पुरसकार वितरण सोहळ्यात बोलताना स्वत:च्या भाषणाला वकार यांनी क्रीडाक्षेत्र, फिटनेस आणि युवांवर अधिक क्रेंदीत ठेवले, परंतु त्यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात देशात स्थैर्याच्या गरजेवरही जोर दिला आहे. सातत्याने उलथापालथ देशासाठी चांगले नाही, यामुळे युवांवर प्रतिकूल परिणाम होतो असे त्यांनी म्हटले आहे.
स्थिरतेवर जोर
बांगलादेशचे सैन्यप्रमुख जनरल वकार-उज-जमां यांनी मागील महिन्यात देशात शांतता आणि स्थैयाचे आवाहन केले होते. आम्ही एक शांततापूर्ण वातावरण इच्छितो. बांगलादेशची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासासाठी शांतता आणि स्थिरता महत्त्वपूर्ण आहे. याच्याशिवार कुठलाही विकास आणि सुशासन असू शकत नाही. याचमुळे आम्हाला परस्परामंध्ये सहिष्णुता बहाल करण्याची गरज आहे. तडजोडीच्या दिशेने पावले टाकत राष्ट्रीय सहमतीचे वातावरण निर्माण करावे लागेल असे सैन्यप्रमुखांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
भारतासोबतचे संबंध
बांगलादेशसाठी भारत महत्त्वपूर्ण शेजारी आहे. आम्ही अनेक अर्थांनी भारतावर निर्भर आहोत. तर भारत देखील आमच्याकडून सुविधा प्राप्त करतो. दोन्ही देश स्वत:च्या सुरक्षा आवश्यकता, आर्थिक घडामोडी आणि इतर गरजांसाठी परस्परांवर निर्भर आहेत. अशा स्थितीत दोन्ही देशांना चांगले संबंध राखून वाटचाल करावी लागणार असल्याचे जनरल वकार यांनी नमूद केले होते. आम्ही आमच्या कुठल्याही शेजारी देशाच्या रणनीतिक हितांच्या विरोधात कृत्य करणार नाही. तसेच आमचा शेजारी आमच्या हितांच्या विरोधात काही करणार नाही अशी अपेक्षा करू. दोन्ह देशांना परस्परांच्या हितांची काळजी घ्यावी लागेल असे त्यांनी म्हटले होते.
अंतरिम सरकारला उशिरा आली जाग
बांगलादेशात अवामी लीगच्या नेत्याच्या निवासस्थानावर हल्ल्यानंतर तेथील प्रशासन जागे झाले आहे. ढाक्याच्या गाजीपूर जिल्ह्यात समाजकंटकांनी माजी मंत्री मोजम्मेल हक यांच्या निवासस्थानावर हल्ला केला, यात अनेक जण जखमी झाले आणि स्थिती तणावपूर्ण झाली. यानंतर बांगलादेश सरकारने तत्काळ ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरू करत 40 जणांना अटक केली आहे. जिल्ह्याच्या विविध हिस्स्यांमधून संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चौधरी जाबेर सादिक यांनी दिली आहे. हल्ल्यादरम्यान अवामी लीगशी निगडित प्रतीकं आणि कार्यालयांची तोडफोड करत नुकसान पोहोचविण्यात आले होते. बांगलादेशात राजकीय तणाव कायम असून अवामी लीग आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून परस्परांवर हल्ले केले जात आहेत.









