Bangalore Meat Ban : गणेश चतुर्थीनिमित्त पालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार असा आदेश बेंगळूर महानगरपालिकेने घेतला आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी गणरायाचं आगमन होतं. त्यामुळे या दिवशी मांस विक्री आणि प्राण्याच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे.पालिकेच्या या आदेशावर एमआय़एम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवत टिका केली आहे.
कर्नाटकात 80 टक्के लोक मांसाहार करतात. सरकारने मांस विक्रीवर बंदी घालून गरिबांना शिक्षा दिली आहे. कर्नाटकातील सरकार धन दांडग्याचे आहे. भाजप जगाला काय संदेश देऊ इच्छिते असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.तसेच महापालिकेचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा देखील ओवेसींनी केला आहे. कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला आहे. यावर भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे.
अनेक सणांच्या वेळी मांस विक्रीवर बंदी घातली जाते
असे प्रतिबंध यापूर्वी देखील लागू करण्यात आले होते. अनेक सणांच्या वेळी मांस विक्रीवर बंदी घातली जाते.यामध्ये कोणतीही नवीन बाब नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते एस.प्रकाश यांनी दिली आहे . यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी, बेंगळूर महापालिकेने कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. तसंच बुद्ध पौर्णिमा आणि राम नवमीला देखील बेंगळूर महानगरपालिकेने मांस विक्रीवर बंदी घातली होती.
महापालिकेच्या परिपत्रकात नेमकं काय?
महापालिकेने मांसविक्रीबाबत जे परिपत्रक जारी केलं आहे, ते स्थानिक कन्नड भाषेतील आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, “बुधवारी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला पशू हत्या आणि मांसविक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा निर्णय संपूर्ण महापालिका हद्दीसाठी लागू असेल. विक्रेते, नागरिकांनी महापालिकेच्या नियमाचं पालन करावं. असा उल्लेख त्यात केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









