वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या अटितटीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सचा टायब्रेकरमध्ये 6-4 अशा गुणांनी पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 38-38 असे गुण बरोबरीत होते.
या सामन्यात पाटणा पायरेट्सचा अयान लोचाबने सुपर 10 गुणांची नोंद केली. तर नवदीपने 4 टॅकल गुण मिळविले. लोचाब आणि नवदीप यांच्या शानदार कामगिरीमुळे पाटणा पायरेट्सला हा सामना जिंकता आला. टायब्रेरकरमध्ये मनदीप कुमारच्या शानदार कामगिरीमुळे प्पाटणा पायरेट्सला दोन गुण मिळालेबेंगळूर बुल्सतर्फे अलिरझाने सुपर 10 गुण मिळविले. पण ते वाया गेले. अलिरझाने या स्पर्धेच्या इतिहासात नवव्यांदा सुपर 10 गुण मिळविले आहेत. या सामन्याच्या निर्धारीत वेळेत अयान आणि अलिरझा यांची कामगिरी दर्जेदार झाली. अयान आणि अलिरझा यांनी प्रत्येकी अनुक्रमे बेंगळूर बुल्स आणि पाटणा पायरेट्स यांच्या गुणाचे खाते उघडले. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सने पाटणा पायरेट्सवर 8-7 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरावेळी पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 16-13 अशी आघाडी घेतली होती. मात्र पाटणा पायरेट्सच्या खेळाडूंनी खेळाच्या उत्तरार्धाताला दमदार प्रारंभ करताना आक्रमक धोरणावर अधिक भर दिला. अयानच्या कामगिरीमुळे पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर पहिल्यांदाच 27-16 अशी 11 गुणांची आघाडी मिळविली. अयानने सुपर 10 गुण नोंदविले. त्यानंतर अलिरझा मिर्झाने आपल्या दमदार चढायांवर बेंगळूर बुल्सला झटपट गुण वसुल करुन दिले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सने बेंगळूर संघावर 28-18 अशी 10 गुणांनी आघाडी मिळविली होती. त्यानंतर 6 मिनिटांच्या कालावधीत अलिरझा, आशिष मलिक आणि गणेशा यांनी आपल्या शानदार चढाईच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले. अलिरझाने पाटणा पायरेट्सचे सर्वगडी बाद केल्याने यावेळी गुणांची स्थिती 30-28 अशी होती. अलिरझाने त्यानंतर बेंगळूर बुल्सला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 38-38 असे गुण बरोबरीत राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. टायब्रेकरमध्ये मनीषने आपल्या शेवटच्या चालीवर अयानला बाद केले. टायब्रेकरमध्ये सुधाकर आणि आशिष मलिक अनुक्रमे पाटणा पायरेट्स आणि बेंगळूर बुल्सचे खाते उघडले. मनदीप कुमारने यावेळी आपल्या चढाईवर पाटणा पायरेट्सला महत्त्वाचे गुण मिळवून दिले आणि अखेर पाटणा पायरेट्सने हा सामना टायब्रेकरमध्ये 6-4 अशा फरकाने जिंकून दिला.









