वृत्तसंस्था/ बेंगळूर
पुढील आठवडय़ात ब्रिटनमध्ये होणाऱया पीएल नेक्स्टजेन चषक फुटबॉल स्पर्धेसाठी रविवारी बेंगळूर एफसी संघाने 20 जणांचा चमू जाहीर केला आहे. या संघाला नौशाद मुसा हे प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत.
बेंगळूर एफसी संघाने अलीकडेच फेलिक्सन फर्नांडिस, क्लॅरेन्स फर्नांडिस आणि अंकित पद्मनाभन यांच्याशी नवा करार केला आहे. बेंगळूर एफसी संघाचे नेतृत्व एन. भुतियाकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये काही अनुभवी तसेच काही नवोदित खेळाडूंचे मिश्रण आहे.
बेंगळूर एफसी संघ – गोलरक्षक- दीपेश चौहान, एस. पडत्तील, बचावफळी- फेलिक्सन फर्नांडिस, क्लेरन्स फर्नांडिस, रॉबिन यादव, एन. भुतिया (कर्णधार), रजनवीर सिंग, टी. मेताई, मध्यफळी- कमलेश पलानीसॅमी, बी. ओरम, एस. नेमब्राथ, डी. लिंगडोह, एल. फेनाई, लालरेमतुआंगा फेनाई, आघाडीफळी- लालपेखलुआ, एम. मोला, अंकित पद्मनाभन, थोई सिंग, शिवशक्ती नारायणन आणि आकाशदीप सिंग,.









