भूस्खलनाच्या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : बेंगळूर-बेळगाव मार्गावर हिरीयूर (जि. चित्रदुर्ग) येथे झालेल्या भूस्खलनामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. बेळगावला येऊन पोहोचण्यासाठी तब्बल 15 तासांचा प्रवास करावा लागला. रात्री उशिराने निघालेल्या खासगी बसेस दुसऱ्या दिवशी दुपारी बेळगावात पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. बेंगळूर, मंगळूर, बळ्ळारी, चित्रदुर्ग आदी लांब पल्ल्याच्या मार्गावर रात्री आरामदायी बसेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र काही संकटांमुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिरीयूर येथे घडलेल्या घटनेमुळे बेंगळूर-बेळगाव बससेवेवरही परिणाम झाला. प्रवाशांना तब्बल 15 तास बसमध्ये बसावे लागले.









