ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे हभप. बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य धक्का आला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
बंडातात्या कराडकर काल फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील मठात आले होते. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना फलटणमधील निकोप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बंडातात्या यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. मात्र, त्यानंतर त्यांचा MRI आणि अँजिओग्राफी केल्यावर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना आज पुण्याला हलविण्यात आले असल्याची माहिती निकोप रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.