प्रतिनिधी
बांदा
प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा ग्रामस्थांनी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज संस्थापित श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले. या पदयात्रेत युवक ,महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.सकाळी बांदा येथुन सुटलेले ग्रामस्थ दुपारी मंदिरातील आरतीच्या वेळी माणगावात पोहोचले. दर्शन व आरतीनंतर महाप्रसाद घेऊन सर्वजण बांदा येथे परतले. बांदा ते माणगाव या पहिल्या पदयात्रेने बांदावासियांच्या विविध पदयात्रांना आरंभ झाला असून पुढील पदयात्रांच्या तारखा त्या त्या वेळी घोषित करण्यात येतील असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी कळविले आहे.









