प्रतिनिधी
बांदा
बांद्यात दिनांक 15 ऑगस्टला होऊ घातलेले दाणोली मुख्य रस्ता ते अजय परब घर या रस्त्या संदर्भातील प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करून कामाला योग्य ती गती देण्यासाठी करण्यात येणारे उपोषण बांदा ग्रामपंचायतच्या लेखी हमी नंतर मागे घेण्यात आले.
सदर हमी देताना ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सरपंच प्रियंका नाईक, ग्रामसेवक लीला मोर्ये , ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे प्रशांत बांदेकर आणि तनुजा वराडकर आदी उपस्थित होते, उपोषणकर्त्या ग्रामस्थांतर्फे शांताराम परब, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, केशव नाईक, दिगंबर चव्हाण, रामदास हुमरसकर , राजु हुमरसकर ,अजय परब ,संजय परब ,लक्ष्मण केरीकर ,रामा पेडणेकर , तुळशीदास कविटकर इत्यादी उपस्थित होते









