मयुर चराटकर
बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात विनापरवाना होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभाग गेले काही दिवस ऍक्शन मोडवर आहे. आज सकाळी बांदा बसस्थानक समोर गोव्याच्या दिशेने विनापरवाना खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. कारवाईमुळे विनापरवाना खनिज वाहतूक करणाऱ्या वाहतुकीला लगाम लागणार आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील इन्सुली, बांदा याठिकाणी खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. शनिवारी सकाळी बांदा बसस्थानक समोर महसूल बांदा मंडल पथकाने एका डंपरवर कारवाई केली. सदर वाहन विनापरवाना खडी वाहतूक करत असल्याने बांदा महसूल पथकाने कारवाई केली. सदरचा डंपर पुढील कारवाईसाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









