प्रतिनिधी
बांदा
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा आणि इंग्लिश मीडियम स्कूल बांदा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात “रंगशिशिर” या वर्षी १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. बांदा हायस्कूलच्या पटांगणावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम साहेब भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले, संस्थाध्यक्ष श्रीमती कल्पना तोरसकर, उद्योजक जयंत म्हावळणकर , जयकुमार पारिपत्ये, रूपेश राऊळ शिवसेना तालुकाध्यक्ष सावंतवाडी, साईप्रसाद काणेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक १८ रोजी माध्यमिक विभाग आणि इंग्लिश मीडियम स्कुल तर १९ रोजी उच्च माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
Previous Articleमार्गशीर्ष गुरुवारसाठी बाजारात गर्दी
Next Article रामभाऊंच्या पत्रकारितेतून नव्या पिढीने आदर्श घ्यावा









