राष्ट्रीय बजरंग दल गोवाची मागणी
प्रतिनिधी /वास्को
गोव्यात आतापर्यंत धार्मिक सलोखा हिंदूनीच राखला आहे, आमच्या मंदीरातून तलवारी सापडल्याचा दाखला नाही, पण मशिदीमध्ये अनेक वेळा असे प्रकार? घडले आहेत. मशिदीमध्ये तलवारी ठेवण्याचा उद्देश काय? म्हणजेच या अतिरेकी कारवाया करून दंगल घडवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोप्य?लर प्रंट ऑफ इंडिया ही संघटनाच मुळात अतिरेकी संघटना आहे, आधी या संघटनेवर बंदी घातली पाहीजेत, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल, गोवाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे.
रामनवमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिरवणुकीत दगड मारून पॉप्युलर प्रंट यासंघटनेच्याच अतिरेक्मयांनी सुरूवात केली. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून हिंदू बांधवांवर कारवाईची मागणी करत आहेत. वास्तविक ही संघटनाच मुळात अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर कारवाई नव्हे तर बंदी घातली पाहिजे, असे फळदेसाई म्हणाले.
भारतात राहाणारे, भारताचे खातात, पण वंदे मातरम् म्हणायला लाज वाटते. अशा अतिरेकी कारवाया करून गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा यांचा मनसुबा उधळून लावला पाहिजे. यासाठी संघटनेवर बंदी हा एकमेव पर्याय असल्याचे फळदेसाई म्हणाले.
जयेश नाईक ,राजीव झा आणि अन्य कार्यकर्त्यांना गुंड म्हणण्या आधी चारवेळा विचार करावा, दगडफेकीची घटना घडली नसती तर पुढचा प्रकार घडलाच नसता, आधी दगडफेक करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी फळदेसाई यांनी केली.








