कर्मचाऱ्यांसाठी राहणार नियम : सरकारी कागदपत्रे आणि डेटासाठी धोकादायक
नवी दिल्ली :
भारताच्या अर्थ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कार्यालयीन कामासाठी चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळण्यास सांगितले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, अशी एआय टूल्स सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण करतात. ही माहिती अंतर्गत विभागाच्या सल्लागाराकडून मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया व इटलीसारख्या देशांनीही डेटा सुरक्षा धोक्यांचा हवाला देत डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे.
अहवाल सोशल मीडियावर
या अहवाल मंगळवारी सोशल मीडियावर आला. दरम्यान, ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन भारत दौऱ्यावर आले आहेत. जारी केलेल्या मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की, ‘ऑफिस संगणक आणि उपकरणांमध्ये एआय टूल्स आणि एआय अॅप्स (जसे की चॅटजीपीटी, डीपसीक) सरकारी डेटा आणि दस्तऐवजांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करतात हे निश्चित झाले आहे.’
मंत्रालयाने अद्याप या बाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, भारताच्या अर्थ मंत्रालय, चॅटजीपीटी-पालक ओपनएआय आणि डीपसीक यांच्या प्रतिनिधींकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया मिळालेली नाही. अर्थ मंत्रालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चिठ्ठीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.









