वृत्तसंस्था/ दुबई
अफगाण क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज नवीन उल हकवर 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता नवीन उल हकला आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लिग टी-20 स्पर्धेत खेळता येणार नाही.
इंटरनॅशनल लिग टी-20 मालिका पहिल्यांदाच भरविली जात असून या पहिल्या हंगामासाठी नवीन उल हकने शारजा वॉरियर्स बरोबर करार केला होता. आंतरराष्ट्रीय लिग स्पर्धेसाठी नवीन उल हकने शारजा वॉरियर्स बरोबरचा करार मोडल्याने त्याच्यावर आता 20 महिन्यांच्या कालावधीकरीता बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.









