सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ; खाणींमुळे वन्य जीव सृष्टीला येते बाधा,खाणीं सुऊ करण्याच्या प्रयत्नांना धक्का
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गुऊवारी दिलेल्या एका आदेशामुळे संरक्षित वनक्षेत्र, अभयारण्ये यांच्या 1 किमीच्या परिघात कोणत्याही प्रकारच्या खाणी सुऊ करता येणार नाहीत, असे स्पष्ट केल्याने गोव्यातील सुऊ होणार असलेल्या अभयारण्यापासून जवळच्या खाणी आता कायमस्वऊपी बंद पडणार आहेत. दक्षिण गोव्यातील कित्येक खाणींवर या आदेशाचा गंभीर परिणाम होणार आहे. गोवा सरकारने खाणी चालू करण्यासाठी जाहीर लिलाव पुकारण्यास प्रारंभ केल्यानंतर आतापर्यंत पाच ते सात खाणींसाठी प्रक्रिया पूर्णही झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अलिकडेच सर्व खाणींना पर्यावरण परवाने नव्याने घ्यावे लागतील असे आदेश दिल्याने डिसेंबरपर्यंत सुऊ होणार असलेल्या खाणींवर संक्रात आली आहे. या खाणी आता पुढील 2 वर्षे सुऊ होण्याची शक्यताच मावळली. उच्च न्यायालयाचा आदेश होतोय न होतोय तोच आता सर्वोच्च न्यायालयाने गुऊवारी टी. एन. गोदावर्मन प्रकरणी न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ या पीठाने दिलेल्या आदेशात संरक्षित क्षेत्र, पर्यावरण संवेदन क्षेत्र किंवा संरक्षित वनक्षेत्राच्या 1 किमी परिघात कोणत्याही प्रकारच्या खाणी सुऊ करता येणार नाहीत. खाणींमुळे पर्यावरणाला बाधा येते. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये वगैरेच्या 1 किमी व त्याही पुढील परिसरात कोणत्याही प्रकारचे खाण उद्योग सुऊ करता येणार नाही. जीवसृष्टीला बाधा होईल अशा प्रकारच्या खाण उद्योगास सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. यापूर्वी दि. 3 जून 2022 रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये देखील गुऊवारी दुऊस्ती केली आहे. 1 किमीच नव्हे तर त्याही पुढील क्षेत्रात देखील खाणी सुऊ करता येणार नाहीत.
गोव्यातील खाणींना आणखी एक दणका
सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्यामुळे भगवान महावीर अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, म्हादई अभयारण्यापासून 1 किमी व त्याही पलिकडील अंतरावरील खाणी सुऊ करता येणार नाहीत. गोव्यातील खाणींसाटी हा आणखी एक प्रकारचा दणका आहे. त्यामुळे सरकारला आता कित्येक खाणींचा लिलाव पुकारता येणार नाही. त्या परिसरातील कित्येक खाणी या आता कायमस्वऊपी बंद पडल्या आहेत.









