झुरिच / वृत्तसंस्था
फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेने शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेवरील निलंबन रद्दबातल ठरवले. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक समिती बरखास्त केल्यानंतर फिफाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता ऑक्टोबरमधील महिला यू-17 विश्वचषक स्पर्धेचे भारताचे यजमानपद कायम राहणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा दि. 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. फिफाने यापूर्वी त्रयस्थांच्या हस्तक्षेपामुळे 15 ऑगस्ट रोजी भारताला निलंबित केले होते. त्यानंतर अवघ्या 11 दिवसात त्यांनी हा निर्णय मागे घेतला.









