13 फुटांवर उभारण्यात आली कमान
बेळगाव : टिळकवाडी तिसरे रेल्वेगेट येथील नवीन रेल्वे ओव्हर ब्रिज खालून 13 फुटांहून अधिक उंच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. उंच अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना यापुढे गोगटे सर्कलमधून बसवेश्वर उड्डाणपूल मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. रविवारी काँग्रेस रोडवर लोखंडी कमान उभारण्यात आल्याने अवजड वाहनांना पुन्हा माघारी फिरावे लागले.









