आरामात फिरू शकतात विदेशी
स्वातंत्र्यानंतर देशातील लोक स्वतःच्या मर्जीने देशात कुठेही राहण्यास आणि हिंडण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहेत. परंतु या स्वतंत्र भारतात काही अशी ठिकाणे आहेत, जेथे विदेशी नागरिकांना सहजपणे प्रवेश मिळतो, तर भारतीयांना येथे हा प्रवेश मिळविणे अवघड आहे.
चेन्नईतील रेड लॉलिपॉप हॉस्टेल
चेन्नईच्या या हॉस्टेलमध्ये नो इंडियन पॉलिसी आहे. येथे केवळ विदेशी पासपोर्ट असलेले लोकच बुकिंग करू शकतात. परंतु विदेशी पासपोर्ट असणारे भारतीय वंशीय येथे वास्तव्य करू शकतात.

कुडनकुलमची रशियन कॉलनी
तामिळनाडूच्या कुडनकुलममध्ये निर्माण करण्यात आलेल्या रशियन कॉलनीत कुडनकुलम आण्विक प्रकल्पाशी निगडित लोक राहतात. येथे घरे, क्लब, हॉटेल आणि अनेक सुविधा आहेत. या कॉलनीत भारतीयांच्या प्रवेशावर बंदी आहे.
अहमदाबादमधील सकुरा रयोकान रेस्टॉरंट
अहमदाबादच्या या रेस्टॉरंटमध्ये केवळ जपानी लोकांना खाद्यपदार्थ मिळतात. तर या रेस्टॉरंटचा मालक एक भारतीय आहे. या रेस्टॉरंटमध्ये एकदा एका वेट्रेसची काही भारतीयांनी छेड काडली होती. तेव्हापासून भारतीयांना येथे प्रवेश नाकारण्यात येतो.
बेंगळूरमधील उनो-इन हॉटेल
बेंगळूरच्या या मालमत्तेला तेथील महापालिकेने बंद केले होते. या हॉटेलवर केवळ जपानी लोकांना सर्व्हिस पुरविण्याचा आरोप होतो. परंतु ही मालमत्ता आता ओयोच्या अंतर्गत असून येथे भारतीयांनाही सर्व्हिस मिळू लागली आहे.
फ्री कसोल कॅफे
या कॅफेत भारतीय असल्याने प्रवेश मिळाल्याची तक्रार काही जणांनी केल्यापासून हा कॅफे चर्चेत आला आहे. या कॅफेच्या मालकाने हा आरोप फेटाळला होता. काही भारतीयांनी या कॅफेत गोंधळ घालत मालक असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केले होते. तेव्हापासून येथे भारतीयांना रोखले जात असल्याचे बोलले जाते.
चेन्नईतील ब्रॉडलँड्स हॉटेल
चेन्नईच्या या हॉटेलमध्ये केवळ विदेशी पासपोर्टधारकच वास्तव्य करू शकतात. काही खोल्या भारतीयांसाठी आहेत, परंतु विदेशी पर्यटक कमी संख्येत पोहोचले तरच त्या मिळू शकतात. एका भारतीयाला ऑनलाइन रिझर्व्हेशन नंतरही या हॉटेलमध्ये राहू दिले गेले नव्हते असा दावा एका बुकिंग साइटने केला होता.









