भारत ट्रान्स्पोर्ट असोसिएशन ग्रुपची मागणी
बेळगाव : ऑटोरिक्षातून लगेज घेऊन जाण्यास बंदी करण्यात यावी, अशी मागणी भारत ट्रान्स्पोर्ट असोसिएशन ग्रुपने केली आहे. ग्रुपच्या सदस्यानी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. ऑटोरिक्षांमध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा आहे. मात्र, अलिकडे ऑटोरिक्षातून अमर्याद लगेजची वाहतूक करण्यात येत असते. त्यामुळे लहान गुड्स वाहनचालकांवर अन्याय हेत आहे. भाडे मिळविण्यासाठी गुड्स वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते. मोटारवाहन कायदा 1988 च्या सेक्शन 66 अंतर्गत ऑटोरिक्षातून 40 किलो पेक्षा अधिक लगेच नेण्यास बंदी आहे. पण, या नियमाचे अनेक ऑटोरिक्षा चालकांकडून उल्लंघन होत असते. याबाबत वाहतूक विभागाकडे फोटोसह पुरावा सादर केला आहे. तक्रारही केली आहे. पण, तक्रारीची दखल पोलिसांनी घेतलेली नाही.
तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन
गुड्स वाहनचालकांच्या तक्रारीची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा येत्या काही दिवसांत गुड्स वाहनमालक व चालकांनी आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.









