सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्रे आज निवडणूक विभागाने ताब्यात घेतली. सर्व मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना झाल्या असून सकाळी दहा वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथून एसटी बस तसेच खाजगी वाहने मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत. जवळपास 1800 कर्मचारी रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली . सावंतवाडी विधानसभा मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना होताना घटनास्थळी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पाहणी केली. ते म्हणाले , शांततेत आणि निर्भीडपणे लोकांनी मतदान करावे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा ठेवण्यात आल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.









