वार्ताहर /सांबरा
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बळळारी नाल्याचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. पूर्व भागामध्येही पावसाचा जोर वाढला आहे. अशातच बळळारी नाल्याच्या पात्रातील पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. नाल्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे तर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे नाल्याचे पात्र दिवसेंदिवस अऊंद होत चालले आहे.









