प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात मागील 8 दिवसांपासून पडणाऱया पावसाने रविवारी चांगलीच विश्रांती घेतल़ी खरिपाच्या शेतीचे काम सर्वत्र जोरात सुरू असताना अचानक पावसाने घेतलेल्या उसंतीमुळे बळीराजा चिंतातूर झाला आह़े भातलावणीच्या कामासाठी दमदार पावसाची गरज असत़े ऐन मोक्याच्या वेळी पावसाने दडी मारली आह़े
कोकणासह जिह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग पहावयास मिळाली होत़ी या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरूवात झाली होत़ी काही ठिकाणी लावणीच्या कामाला सुरूवात झाली आह़े रत्नागिरी जिह्यात भातशेतीबरोबरच नाचणी व वरीचे पीकही घेण्यात येत़े यासाठी चांगल्या पावसाची आस शेतकऱयांना आह़े पावसाने दडी मारल्याने आता जमिनीला तडे जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आह़े
रत्नागिरी जिह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली होत़ी त्यामुळे नदी व ओढे चांगलेच प्रवाहित झाले आहेत़ काही ठिकाणी नदी व ओढय़ाच्या पाण्यावर लावणीचे काम उरकून घेण्याकडे भर दिला जात आह़े मात्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती पाऊस गायब झाल्याने लावणी कशी सुरू करायची, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आह़े पुढील आठवडय़ात चांगला पाऊस झाला नाही तर नुकसानीलाही समोर जाण्याची भीती बळीराजाला आह़े कोकणात बहुतेक करून भातशेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आह़े पारंपरिक शेतीबरोबरच आता आधुनिक पद्धतीचीही जोड भातशेतीला मिळत आह़े मोठय़ा प्रमाणावर भातशेतीचे उत्पन्न कोकणात घेतले जात़े असे असले तरी बिनभरवशाच्या पावसामुळे अलिकडे भातशेतीचे नुकसान होत असल्याचे समोर आले आह़े त्यातच शासनाकडून मदत मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आह़े त्यामुळे वरुणराजाची कृपा होण्याची आस बळीराजाला लागून राहिली आहे









