कराड : मागील पाच वर्षामध्ये साखरेचा बाजार भाव २२०० रुपयांवरून ३ हजार पाचशे रुपयेपर्यंत साखरेला प्रतिक्विंटल भाव वाढलेला असताना सुद्धा मागील तीन- वर्षात ऊसाला तीन हजार शंभर रुपये वरून २८०० रुपयापर्यंत कारखानदारांनी उसाचा भाव कमी केलेला आहे. याचा निषेध म्हणून आज दीपावलीच्या दिवशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराड तहसीलदार कार्यालय येथे खर्डा भाकरी खाऊन साखर कारखानदारांचा जाहीर निषेध केला.
साखरेचे भाव वाढलेला असताना सुद्धा उसाचा भाव कमी का झाला? याचा विचार ऊस उत्पादकांनी केला पाहिजे. मागील पाच वर्षात उसाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढलेला आहे शेअर भांडवल दीडपट वाढलेले आहे मात्र उसाचा दर मागील तीन वर्षात कमी केल्याबद्दल साखर कारखानदारांचा बळीराजा शेतकरी संघटनेने दिपवाळी दिवशी तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन कारखानदारा विरोधात घोषणा देऊन कारखानदारांचा निषेध केला.
येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करूनच ऊसाला तोड सुरू करावी, अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड घेणार नाहीत, याची नोंद साखर कारखान्यांनी घ्यावी. तसेच बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत साखर कारखानदार उसाचा दर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत आपल्या शेतातील व गावातील ऊस तोडी घेऊनयेत व घेतल्यास ऊस तोडी, उसाची वाहतूक थांबवण्यात यावी. तरच आपल्या ऊसाला योग्य भाव मिळणार आहे. या आंदोलनात पंजाबराव पाटील, बी. जी. काका पाटील, प्रदेशाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हाध्यक्ष उत्तम अण्णा खबाले त्यांच्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Articleनाणीज-कशेळी पुलाजवळ बस कलंडली
Next Article शेतकऱ्यांनो …आता तुम्हीच रोखा काटामारी !









