नागरिकांची गैरसोय दूर
कसबा बीड/ वार्ताहर
गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस, राधानगरी धरणातून सुटणारी पाणी तसेच ओढ्या नाल्यांच्या मधून येणारे पाणी यामुळे कोल्हापूर जिल्हा जलमय झाला होता.कालपासून पावसाने उघडीत दिल्यामुळे व राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने नदीपत्रातील व ज्या पूलांवर पाणी आलेले आहे तेथील पाण्याची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे अनेक पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे वाहतूक पर्वत होत आहे.पण कोल्हापूर गगनबावडा रोडवरील बालिंगा पुलावर सकाळी पाणी असल्यामुळे वाहतूक बंद केली होती. यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या कडून या पुलावरून वाहतूक सुरू करावी या मागणीस जोर धरला होता.
पावसाची उघडीप व पाणी पातळी कमी झाल्याने या मार्गवरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. पण लागणारा पाऊस , धरणातून सुटणारे पाणी या सर्वांचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा लागतो. पर्यायी पाऊस कमी झाल्याने व कॉग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील, तसेच माजी आमदार चंद्रदीप नरके, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी आदी मान्यवर यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, नॅशनल हायवेचे अधिकारी मुधळे आणि शिंदे यांच्याकडे रस्ता चालु करण्यासंदर्भात मागणी लावून धरली होती.
त्यावर नागरिकांची होणारी गैरसोय आणि स्थानिक लोकांच्या मागणीमुळे त्यावर सबंधित आधिकारी यांनी सायंकाळपर्यंत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्र्वासित केले होते.
आज सायंकाळी राष्ट्रिय महामार्गाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी एक निवेदन काढून कोल्हापूर-गगनबावडा सुरु करण्याची परवानगी दिली. प्रशासनाने वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिल्याने मान्यवरांच्या व नागरिकांच्या मागणीला यश आले आहे. नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.