समिधा, ऋतुजा याला सुवर्णपदके
बेळगाव : मुगलखोड येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या बालिका आदर्श कुस्ती केंद्राच्या मल्लांनी 2 सुवर्ण, 1 रोप्य व 4 कांस्यपदकांची कमाई केली. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मुलींच्या 35 किलो वजनी गटात समिधा बिर्जेने प्रथम क्रमांकसह सुवर्ण, सुकन्या कुपानीने तृतीय क्रमांकासह कांस्य, 45 किलो वजनी गटात ऋतुजा रावळने प्रथम क्रमांकासह सुवर्ण, तन्वी पाटीलने तृतीय क्रमांकसह कांस्य, 50 किलो वरील वजनी गटात कल्याणी आंबोळकरने रैप्यपदक तर विद्या मोहितेने कांस्यपदक घेतले. मुलांच्या 38 किलो वजनी गटात संग्राम गावडाने कांस्यपदक पटकाविले. या सर्व मल्लांना कुस्ती प्रशिक्षक माऊती घाडी, क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन तर आनंद गाडगीळ, परशराम पाटील, बसु कुपानी, मनोर गावडा यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









