बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व स्वाध्याय विद्यामंदिर स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर शहापूर, अनगोळ, टिळकवाडी विभागीय प्राथमिक क्रीडा स्पर्धेत कबड्डी स्पर्धेमध्ये पंडित नेहरू संघाने संत मीराचा तर मुलींमध्ये बालिका आदर्शने केपीएस भाग्यनगर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. हे दोन्ही संघ शहर तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये 20 संघाने तर मुलींमध्ये 16 संघाने भाग घेतला होता. मुलींच्या पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने मराठी मुलांची शाळा क्रमांक 5 नाजगरी संघाचा 22-11 पराभव करून तर दुसरा उपात्य फेरीत भाग्यनगर संघाने सन्मत्री संघाचा 17-13 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत बालिका आदर्श संघाने के पी एस भाग्यनगर संघाचा 21-5 अशा गुणाने पराभव करून विजेतेपद फटकाविले.
मुलाच्या पहिला उपांत्य फेरीत पंडित नेहरू संघाने आदर्श शहापूर संघाचा 16-13 अशा गुणाने तर दुसरा उपात्य संत मीराने भाग्यनगर संघाचा 15-11 अशा गुणाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचे उद्घाटन केएलएस स्कूलच्या अॅडमिनिस्ट्रेटर विनायक कुलकर्णी, एसडी ए विनायक नायक यांच्या हस्ते संत मीरा व पंडित नेहरूच्या खेळाडूंची ओळखी केले. या सामन्यात पंडित नेहरू संघाने अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी 13-12 पराभव करून विजेतेपद पटकाविले. यासाठी पंच म्हणून उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, सी. आर. पाटील, प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे, निरंजन पाटील, विनायक, सुनिता जाधव, एस. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









