वृत्तसंस्था/भुवनेश्वर
काही दिवसांपूर्वी ओडीशात झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघात प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआय कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे. हे तीन्ही आरोपी रेल्वेचेच कर्मचारी असून त्यांनी सिग्नल यंत्रणेत बदल केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप त्यांच्यावर नोंद करण्यात आला आहे. या अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला होता. तर हजारजण जखमी झाले होते.









