उष:काल मित्र परिवारतर्फे बाळासाहेब काकतकर यांचा वाढदिवस साजरा
बेळगाव : माणसे पैशाने नाही तर प्रेमाने जमा होतात. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी जमलेला जनसमुदाय हीच त्यांची ताकद आहे. त्यांचा 100 वा वाढदिवसही असाच साजरा करण्याची संधी आम्हाला परमेश्वर देवो, अशी सदिच्छा तरुण भारतचे कार्यकारी संपादक जयवंत मंत्री यांनी उष:काल मित्र परिवारातर्फे कोरे सर्कल, कॅम्प येथे आयोजित मराठा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या वाढदिवस प्रसंगी काढले. प्रारंभी नारायण किटवाडकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रकाश चौगुले, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, बी. एस. पाटील, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, सह्याद्री सोसायटीचे रघुनाथ बांडगी, मधू कणबर्गी, शिवाजी हंडे, शिवाजी हंगिरकर, नेताजी जाधव, श्रीकांत देसाई, पी. के. जाधव, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, अजित यादव यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उष:काल मित्र परिवारचे सदस्य, मराठा बँकेचे संचालक शेखर हंडे, सुशीलकुमार खोकाटे, विनोद हंगिरकर, मराठा मंदिरचे पदाधिकारी, मराठा युवक संघाचे चंद्रकांत गुंडकल, मारुती देवगेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे हेमेंद्र पोरवाल, शिंपी समाजाचे अजित कोकणे, जलाराम ट्रस्टचे कन्नुभाई ठक्कर, सेंट्रल हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, अतुल पुरोहित, महेश हणमशेट, महेश कुगजी, मिलिंद देशपांडे, काका तेंडोलकर, विश्वास घोरपडे, अशोक जैनोजी, पी. ओ. पाटील, आर. पी. पाटील, मराठा बँकेचे आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते. सुहास किल्लेकर यांनी आभार मानले.









