Balasaheb’s Shiv Sena will set up a movement for the removal of wild animals
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून होणारी भात शेती बागायती घरांचे नुकसान आणि माकडांकडून होणारा त्रास व त्याला पर्याय तसेच नुकसान भरपाई बाबत शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास या संदर्भात एक अहवाल वन खात्याने तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन सदर तयार झालेला अहवाल शासनाला पाठवण्यात येईल. माकडांची कमिटी तयार करण्यात आली असून या कमिटीने जे तीन निकष दिले आहेत. उपद्रवी प्राणी म्हणून माकडांचा समावेश करावा तसेच हिमाचल प्रदेश प्रमाणे निकष लावावे हिमाचल पॅटर्न कोकणात राबवावा. असे उपवनसंरक्षक यांच्या समवेत झाल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने वन्यप्राणी बचाव व पर्यावरण व निसर्ग संतुलित राखणे या संदर्भात लोक चळवळ उभारण्यात येणार आहे . वनविभाग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 पाणवठे निर्माण केले जाणार आहेत . सोलर कुंपण तसेच जंगल भागात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे . असे उपवनसंरक्षक यांनी स्पष्ट केले आहे . अशी माहिती बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी दिली . सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गावागावात माकडांची दहशत सुरू आहे . घरात घुसणे , छपरांवर चढून छपरांचे नुकसान करणे तसेच केळी बागायती नष्ट करणे , गवारेडे यांच्यापासून शेती बागायतींची हानी त्यामुळे वन्य प्राण्यांची वाढती दहशत संदर्भात आज शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडाने सावंतवाडीतील उपवनसंरक्षक कार्यालयाला भेट देत उपवनसंरक्षक यांच्याशी बैठक झाली यावेळी बिग्रेडियर सुधीर सावंत जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे, तालुका योगेश तुळसकर किसन मांजरेकर , श्री सावंत आधी उपस्थित होते.
सावंतवाडी प्रतिनिधी









