ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद, विधानसभा अध्यक्ष आणि आता विरोधी पक्षनेतेपदावरून डावलण्यात आलं. थोपटे हे लढवय्ये नेते आहेत. पण आमच्याकडूनच त्यांच्यावर अन्याय झाला, अशी कबुली बाळासाहेब थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले, थोपटे संघर्षातून पुढे आलेले नेते आहेत. ते लढवय्ये आहेत. त्यांच्या कुटुंबाची परंपरा काँग्रेससोबत राहण्याची आहे. मविआच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळावं अशी आमची इच्छा होती. मात्र, ते मिळालं नाही. त्यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता विरोधी पक्षनेतेपदावरूनही त्यांना डावलण्यात आलं. आमच्याकडूनच त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय. थोपटे यांच्या गेलेल्या संधीची परतफेड काँग्रेस पक्ष नक्की करेल, असेही यावेळी थोरात यांनी सांगितले.