Balasaheb Thorat :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला. तसेच त्यांना नोकरीत आरक्षण दिले. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. गोविंदा पथकाचे कौशल्य नाकारता येत नाही. त्यांचे कौशल्य धाडस हे मान्य करतो मात्र नोकरीत आरक्षण याचा फेरविचार करणे आवश्यक आहे. भावनिक विचार करून निर्णय घेणे योग्य नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आज कोल्हापुरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. इंग्रजांनी मिठावर कर लावला, त्यांना घालवले. यांनी पिठावर कर लावला हेही जातील असा घणाघात थोरात यांनी केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोनात जे काम उद्धव ठाकरे यांनी केले त्यांची नोंद इतिहासात होईल. मविआ सरकारने चांगल्या पद्धतीने काम केले आहे. आजारपणात काही काम केले नाही हे चुकीचे आहे. इंग्रजांनी मिठावर कर लावला, त्यांना घालवले. यांनी पिठावर कर लावला हेही जातील. सत्तेमुळे मती सुद्धा बदलते, त्यामुळे दीपक केसरकर यांची भाषा बददली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शासनाने डॉल्बी का नको हे पत्रक काढून जाहीर करावे असे काल उदयनराजे म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, समाजात त्याचा परिणाम काय होईल? याची जाणीव असायला हवी. याचे दूरगामी परिणाम होत असताना भावनिक विधान करणे योग्य नाही. डॉल्बीच्या आवाजावर निर्बंध, मर्यादा असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








