प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम रविवार दि. 17 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.









