Satara : घरासमोर फटाके लावणाऱ्या शिंदे गटाच्या शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घरात सगळे झोपण्याच्या तयारीत असताना अचानक फटाके वाजवून परिसराची शांतता भंग करणारे व वयोवृद्धांना त्रास देणाऱ्या शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली.यावेळी सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे,विभाग प्रमुख सुमित नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माझ्या घरात माझी आई वयोवृद्ध आहे.आईला ब्लड प्रेशरचा त्रास आहे.रात्री साडेदहा वाजता घरासमोर फटाके वाजवल्याने आई भयभित झाली.निलेश मोरे यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या टोळक्याने रात्री 10.30 वाजता फटाके वाजवले, ते वाजवायला नको होते. याची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फटाके वाजवण्याचा प्रकार आलेला आहे,असे मागणीत म्हटलं आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









