पवन मंत्री यांच्याकडून पिडीत कुटुंबाचे सांत्वन
सातारा : राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सासपडे (ता.सातारा) येथील अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
माजी मंत्री पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्यासवेत कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय गोरे, माजी संचालक डी. बी. जाधव, भास्करराव गोरे, पै. संजय थोरात, सर्जेराव खंडाईत, उपसरपंच पांडुरंग यादव, माजी सरपंच शिवाजी यादव, बबनराव यादव, श्रीरंग यादव, प्रमोद चव्हाण, शिवानंद चव्हाण, नेताजी पाटील, धनाजी विभुते, उपसरपंच प्रवीण चव्हाण, डॉ. दत्तात्रय चव्हाण, मुकद्दर मुलाणी आदी उपस्थित होते.








