वाढदिनानिमित्त सत्कारमूर्तींचे भावोत्कट उद्गार : कॅम्पमधील कोरे सर्कल येथे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
उषःकाल मंडळाच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मराठा बँकेचे चेअरमन व संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त कॅम्प येथील कोरे सर्कल येथे सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शिवाजी हंडे यांनी प्रास्ताविक केले. उषःकाल मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, डॉ. प्रभाकर कोरे, प्रकाश मरगाळे, दिगंबर पवार, लक्ष्मणराव होनगेकर, शिवाजीराव हंगिरकर, चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, प्रकाश चौगुले, बी. एस. पाटील, पी. के. जाधव, नेमिनाथ कंग्राळकर, महादेव चौगुले, पांडू कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेश कुगजी, अजित यादव, महेश हणमशेट, कन्नुभाई ठक्कर, श्रीकांत देसाई, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, नितीन आनंदाचे, संतोष धामणेकर, अशोक जैनोजी, आर. पी. पाटील, संगम पाटील, उषःकाल मंडळाचे प्रतिनिधी तसेच मराठा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती बाळासाहेब काकतकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा माझ्या मनाच्या गाभाऱयात कायम राहील.
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी अभिनंदनाचा वर्षाव केलात त्याने मी भारावून गेलो आहे. या सत्काराबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. यानंतर सुहास किल्लेकर यांनी आभार मानले.









